Breaking News

भारताविरुद्ध घोषणाबाजी करणार्‍या जेएनयू’मधील सात विद्यार्थ्यांना अटक

नवी दिल्ली, 13 - भारताविरुद्ध घोषणाबाजी करणार्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या प्रमुखाला अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या आणखी सात विद्यार्थ्यांना शनिवार अटक करण्यात आली आहे.
जेएनयू संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली होती, याचा निषेध करत या संघटनेने आंदोलन पुकारले होते. यावेळी भारताविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिल्ली पोलिसांनी सात विद्यार्थ्यांना अटक करत त्यांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले आहे. भारताविरोधी घोषणा देणार्‍या आणि देशाची एकता आणि अखंडत्व यावर प्रश्‍नचिन्ह उभे करणार्‍यांना माफ केले जाणार नाही, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले आहे.