Breaking News

आज माझा वाढदिवस नाही’,पण ’मोदीजी धन्यवाद - अशरफ गनी

नवी दिल्ली, 13 -  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांना शुक्रवारी ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण गनी यांनी जे उत्तर दिले, त्यामुळे दोन्ही नेते ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होते.
मोदींनी ट्विटरवरील शुभेच्छा मेसेज लिहिले होते की, अशरफ गनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो. शुभेच्छा मेसेजच्या उत्तरात गनी यांनी लिहिले की, नमस्कार पंतप्रधान. खरेतर माझा वाढदिवस 19 मे रोजी असतो. पण तरीही
तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.