Breaking News

विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण

सोलापूर, 10 - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुतण्याने पोलिसांना मारहाण केली आहे. त्यामुळे सत्यशील मोहिते पाटील यांना अटक केली आहे.गाडीला कट मारल्याच्या रागातून सत्यशील पाटील आणि त्यांच्या 10 सहकार्‍यांनी पोलिसांशी मारहाण केल्याचा आरोप आहे.  
अकलूजमध्ये काल रात्री पोलिस गस्त घालण्यासाठी जात होते. त्यावेळी दुसर्‍या बाजूने सत्यशील पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांची गाडी येत होती. यावेळी दोन्ही वाहने एकमेकांना खेटून गेल्याने आधी बाचाबाची, त्यानंतर मारहाण झाली. पोलिसांच्या माहितीनुसार सत्यशील पाटील आणि त्यांच्या वाहनांतल्या 10 जणांनी दारु प्यालेली होती. त्यामुळे क्षुल्लक कारणावरुन त्यांनी हा वाद मारहाणीवर नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके आणि इतर दोघांना मारहाण झाली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीला गेलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कोरके आणि पोलिस कर्मचारी इंगोले, चौघुले यांनाही गाडीतील तरुणांनी मारहाण केली. यानंतर पोलिसांनी मारहाण करणार्‍यांपैकी सत्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या 9 सहकार्‍यांना अटक केली असून, अकलूज पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.