Breaking News

हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारासाठी देशभरात प्रार्थना

मुंबई, 10 - लष्करी जवान लान्स नायक हनुमंतप्पांनी सियाचीनच्या रक्त गोठवणार्‍या थंडीत तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांना बरे वाटावे म्हणून संपूर्ण देशात प्रार्थना करण्यात येत आहे. 
हनुमंतप्पा आता दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे कुटुंबीयही रुग्णालयात दाखल झाले. हनुमंतप्पा सध्या कोमात असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती लष्कराने दिली. पुढचे 48 तास हनुमंतपांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. इकडे सार्‍या देशात हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू झाल्या आहेत.