छेड काढल्यामुळे शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या
अजिंठा, 29 - शाळेय विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी मुलीने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना लिहाखेडी ता. सिल्लोड येथे शनिवारी (दि. 27)घडली होती. याप्रकरणी छेडछाड करणार्या अनिल बावस्कर यास अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे.
लिहाखेडी येथील लक्ष्मी ऊर्फ पल्लवी भागवत साखळे (वय 16 रा. लिहाखेडी) असे एकतर्फी प्रेमाचा बळी गेलेल्या मुलीचे नाव आहे. ही अत्यंत हुशार व सामान्य स्वभावाची मुलगी शाळेतही हुशार होती. लिहाखेडी येथे सातवीपर्यंत शिक्षण झाल्याने तिने पुढच्या शिक्षणासाठी पालोद येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. ती शाळेत जात असताना आरोपी अनिल पंढरी बावस्कर हा तिची नेहमी छेड काढायचा. शुक्रवारी तर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब पल्लवीला न पटल्यामुळे तसेच अनिलला सांगूनही सुधारत नसल्याने अखेर शुक्रवारी तिने विषारी औषध सेवन केले होते. त्या अवस्थेत तिने आपली चुलती कविताला ही हकीगत सांगितली. कविताने लगेच तिच्या वडिलाला कळवले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.