2016-17 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर
नवी दिल्ली, 29 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला. ‘शेतकरीविरोधी आणि सूट-बुटातील सरकार’ असा आरोप पुसण्याचा प्रयत्न जेटलींनी आणि पर्यायाने मोदी सरकारने केल्याचं यंदाच्या बजेटमध्ये दिसून आले.
जेटलींनी वैयक्तिक करदात्यांना म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये कोणताही दिलासा न देता, गेल्या वर्षीचेच टॅक्स दर कायम ठेवले आहेत. मात्र 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्यांना 3 हजारांपर्यंतची आयकर सूट मिळणार आहे. यंदाच्या बजेटचा थोडक्यात अर्थ- 1.कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भरघोस तरतूद, 2. रस्ते, रेल्वे सारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्य, 3).कररचना जैसे थे, 4) श्रीमंतांवर वाढीव कर, आणि 5) चैनीच्या वस्तूंवर अधिक भार जेटलींनी वैयक्तिक करदात्यांना म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये कोणताही दिलासा न देता, गेल्या वर्षीचेच टॅक्स दर कायम ठेवले आहेत. मात्र 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्यांना 3 हजारांपर्यंतची आयकर सूट मिळणार आहे.
यंदाच्या अर्थव्यवस्थेत मोदी सरकारने स्वत:वरील ‘शेतकरीविरोधी सरकार’ हा डाग अटोकाट पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी यंदा भरघोस तरतूद केल्याचे पाहायले मिळाले आहे.5 वर्षांत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न * 3 वर्षांत 5 लाख एकर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली * नाबार्डकडून सिंचनासाठी 20 हजार कोटी राखीव निधी * भूजलपातळी वाढवण्यासाठी 60 हजार कोटी रुपये * बी-बियाणे तपासणीसाठी देशभरात 2 हजार प्रयोगशाळा * डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी 5 हजार कोटी रुपये * हमीभावासाठी ऑनलाईन पद्धतीने मालविक्री * पशुधन संजीवन योजने अंतर्गत शेतकर्यांसाठी 4 योजना 38 हजार 500 कोटी रुपयाचा निधी मनरेगावर खर्च करणार * 1 मे 2018 पर्यंत प्रत्येक खेड्यात वीज पुरवठ्याचं उद्दिष्ट * खतांची सबसिडी थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार * केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 सालासाठी अर्थसंकल्प मांडला. या बजेटकडे नोकरदार वर्गाचं फार मोठ्या प्रमाणात आशा होत्या. मात्र, अरुण जेटली यांनी नोकरदारांच्या फारशा अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत.
यंदाही टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, छोट्या करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 5 लाखापर्यंत उत्पन्न असणार्यांना करामध्ये 3 हजारापर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे लहान करदात्यांना खूश करण्याचा मोदी सरकारनं प्रयत्न केला आहे. लहान करदात्यांना जरी खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी श्रीमंतांना करकपात अजिबात करण्यात आलेली नाही. 1 कोटी उत्पन्न असणार्यांना 12 ते 15 टक्के सरचार्ज आकारण्यात आला आहे.
काय काय महागणार ?
महाग - कार, सोने, तंबाखू, सिगरेट, गुटखा, हिरे, ब्रँडेड कपडे * जेटलींच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे * इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणातही बदल नाही * तंबाखूजन्य पदार्थ महाग, तंबाखू, बीडी, सिगरेट महागणार * 10 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्या महागणार * घर भाडे करसवलतीची मर्यादा 24 हजारावरून 60 हजारपर्यंत वाढवली * 5 लाखांपर्यंत कमाई असलेल्या नोकरदारांना आयकरामध्ये 3 हजारांपर्यंतची अतिरिक्त सूट * स्टार्ट अप इंडियासाठी लागणार्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार * रिजर्व बँकेच्या पतधोरणांची बँकांकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी पतधोरणांना वैधानिक दर्जा, लवकरच आरबीआय कायद्यात दुरूस्ती.