बहिणीने रिमोट हिसकावून घेतल्याने आत्महत्या
मुंबई, 29 - टीव्ही बघत असताना बहिणीने वारंवार रिमोट हिसकावून घेतल्याने चिडलेल्या एका 11 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. कल्याणमधल्या वालधुनी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
दुर्गेश सोनीच्या 12 वर्षांच्या बहिणीने त्याच्या हातातून एकसारखा रिमोट हिसकावून घेतला आणि अभ्यासाचे पुस्तकही फाडले, त्यामुळे दुर्गेशने बेडरुममध्ये गळफास लावून घेतला. दुर्गेशची आई कामानिमित्त बाहेर गेली असताना त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.