Breaking News

माणूस आणि जागतिकीकरण

शांततामय समाज ही आज जगाची निकड बनली आहे. जगातील विकसित असो अथवा विकसनशील देश सर्वच आज आपापल्या देशांचे प्रश्‍न सोडवून शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न करित आहेत.  मात्र शांततेचे निर्माण कसे होईल यावर मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही. सिरीया आणि अन्य देशात शांततेच्या अभावाने देश सोडणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
कष्टसाध्य का असेना पण शांततापूर्ण जीवन जगायला मिळावे एवढीच त्यांची साधी अपेक्षा पण जगाच्या आधुनिक समाज व्यवस्थेत त्याची पूर्तता होवू शकत नाही, ही बाब अस्वस्थ करणारी आहे. तसे पाहता आज भारतासह जगात धार्मिक श्रध्दा वाढविण्यासाठी काही बाबा-बुवा प्रयत्न करताना दिसतात. पण इप्सित काही साध्य होताना दिसत नाही. तेव्हा कोणाचे काय चुकते हे शोधण्यापेक्षा शांतता निर्माण करण्यासाठी माणसाने त्याच्या वैयक्तिक जीवनातच बदल घडवून आणावा. पण तो बदल नेमका काय असावा असा प्रश्‍न यावर विचारला जावू शकतो. माणुस हा सृष्टीतील सर्वात बुध्दिमान प्राणी आहे. भाषा आणि हावभाव या दोन्ही बाबी त्याच्याकडे असणारी संवादाची सर्वात प्रभावी साधने आहेत. पण ही साधने केवळ वापरण्यापेक्षा कशी वापरावी हे जर त्याला कळले तर शांततामय समाज अस्तित्वात आणण्याचे निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण होईल. आज आपण बॉडी लॅगवेजची भाषा वापरतो, असे म्हटले जाते. म्हणजे समोरच्या व्यक्तिविषयी आपल्या अंतर्मनातील भावना काय हे चेहर्‍यावरील भावननेतून लगेच लक्षात येते. पण आपण त्याविषयी काळजी करत नाहीत. अर्थात ही बाब आपल्या व्यक्तिमत्वात आधीपासूनच असते, एंगल्सने म्हटले आहे. त्याच्या मते माणूस हा समाजाचा घटक आहे. व्यक्तिचा जन्म हा समाजात होतो. त्या समाजाची भाषा व्यक्ती अंगिकारत असतो. समाजात असणार्‍या सर्वच बाबी त्याच्या व्यक्तिमत्वात विराजमान असतात. या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपणास समाज म्हणून केवळ भारतीयांचाच नव्हे तर जगातील सर्वच समाजाचा विचार करावा लागेल. माञ हा विचार करताना धर्म, पंथ, वर्ण, वर्ग असा विचार न करता विकसित देशातील समाज आणि अविकसित देशातील समाज असा करावा लागेल. साधारणत: संपूर्ण यरोप, अमेरिका, रशिया, ब्राझील, कँनडा, चीन, जपान, कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया आदी देश विकसित मानले जातात. विकसनशिल देशातील माणसे पर्यटनासाठी किंवा नोकरी व्यवसायानिमित्त याच देशांना प्राधान्य देतात. याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे तेथील शांततापुर्ण जीवन. विकसित देशातील माणसांमध्ये असा वेगळा कोणता गुण असतो? तर या प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारात असते. काय असतो नेमका हा संस्कार. तर इतरांना समजून घेण्यास प्राधान्य, आपल्यामुळे इतरांना ञास होणार नाही ही प्रबळ भावना, आपल्याप्रमाणेच इतरांना सकस आहार, शुध्द पाणी, उत्तम शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा आणि पुरेसा रोजगार व राहण्यास सुविधापूर्ण निवारा. यापेक्षा मानव जीवनात आणखी काहीच नको असते. आपल्या भारतात जात, धर्म, पंथ, वर्ण,लिंग, प्रांत या भेदाला जन्म देणार्‍या बाबींचे आम्हाला ज्यादिवशी विस्मरण होईल तो दिवस आमचा देश नव्हे तर राष्ट्राला विकसित करणारा असेल.