Breaking News

देहविक्री करणार्‍या 43 बांगलादेशींना अटक

ठाणे, 21 - गेल्या 14 महिन्यांत ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने देहविक्री करणार्‍या 43 बांगलादेशींना अटक केली आहे.
2015 साली एकट्या ठाणे शहरात पोलिसांनी 30-35 ठिकाणी छापे टाकून 100 पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. यातील अनेक व्यक्ती बांगलादेशी नागरिक असल्याचे आता पुढे आले आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये केलेल्या कारवाईत तीन बांगलादेशी नागरिक पकडले गेले आहेत. यात सर्व कारवाईत अनेक महिलांचाही समावेश आहे.  ठाणे शहरातील कापूरबावडी, कळवा, मुंब्रा, शीळ-डायघर, तर जिल्ह्यातील  डोंबिवली मानपाडा, नारपोली, भिवंडी आणि कोनगाव या परिसरात अनेक बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य आहे.