ना.पंकजाताईकडून डॉ.लक्ष्मण जाधव सत्कारीत
बीड,दि. 10 - मागे काही दिवसापूर्वी बारामती येथे झालेल्या टकारी समाज संघ प्रदेश अध्यक्ष कार्यकारिणी निवडणुकीत खुप अल्पशा अंतराने पराभूत झालेल्या डॉ.लक्ष्मण जाधव यांना मुंबईत एका कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देवून येणार्या काळात समाजहित जोपासावे असा आदेश ना.पंकजाताई पालवे यांनी दिला.
उपेक्षित,वंचित,शोषीत,दुर्लक्षित असलेल्या टकारी समाजाचे संघटन खूप कमकुवत होते. यावर्षी समाजातील विद्वान, समाजाचे जाणकार एकत्र येवून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी पाच पाच सदस्य ग्रामीण व शहरी भागातील घेवून योग्य सदस्यांची निवड ही निवड समितीद्वारे करण्या आली होती. ना.पंकजाताई मुंडे यांनी मुंबई येथे डॉ.लक्ष्मण जाधव यांचा हर्दयपूर्वी सत्कार केला व पुन्हा पहिल्या सारखे समाजाचे काम करावे. मी आपल्या पाठीशी आहे. प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव समाजाला मदत करेल असे वचन दिले.यावेळी खा.प्रितमताई मुंडे, आ.आर.टी.देशमुख, आ.भिमराव धोंडे, दशरथ वनवे, सर्जेराव तांदळे, राजेंद्र बांगर, विक्रांत हजारी, नवनाथ शिराळे, शरद झोडगे, समाधान शेलार, सय्यद शेरू, शेख अजीम, फारूक शेख, विशाल वाघमारे, भागवत सानप इत्यादींसह शेकडो भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.