भीमाकोरेगावच्या शौर्य-स्तंभापासून प्रेरणा घेऊन पुढील कृती कार्यक्रमासाठी सिद्ध होऊ या !
नितीन आगे प्रकरणातील साक्षीदारांसाठी विनंती कृती समितीची स्थापना होणार !
खर्डा गावातील नितीत आगे यांची हत्या भरदिवसा शेकडो लोकांच्या समक्ष करण्यात आली. बर्याच लोकांनी निर्भिडपणे पोलीसांकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविलेत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा कोर्टात केस उभी झाली तेव्हा सर्वच्या सर्व साक्षीदारांनी आपली साक्ष फिरविली. त्यामुळे सर्वच्या सर्व आरोपी निर्दोष सुटलेत. त्याच दिवशी कोपर्डी गावातील एका स्त्रीवर झालेला बलात्कार व खूनाच्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. एका दिवशी घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला असून भारतातील न्यायव्यवस्था व जातीव्यवस्था यांच्यातील संबंधांवर मोठे मंथन सुरू झाले आहे. तसेच गर्दी जमवून न्यायव्यवस्थेवर दबाव आणता येतो का, याचीही चर्चा मोठ्याप्रमाणात सुरु आहे. फेसबुक, व्हॉट्सपसारख्या सोशल मिडियावर हे विषय मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.
खर्डा खून प्रकरणात सर्वच्या सर्व साक्षीदारांनी आपले स्वच्छेने दिलेले जबाब फिरविणे ही सहजा-सहजी घडलेली घटना नव्हे. येथेही जातीव्यवस्थेचा प्रभाव आहेत. या साक्षीदारांवर कोणीतरी दबाव आणला असेल तरच हे असे घडू शकते. आमचा या साक्षीदारांवर कोणताही आक्षेप नाही. उलट त्यांनी उत्स्फुर्तपणे पोलीस स्टेशनला जाऊन न्यायाच्या बाजून आपले जबाब दिलेत. त्यांच्या या धाडसाबद्दल आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. मात्र त्यानंतर त्यांच्यावर दबाव आला. कोणीही सर्वसामान्य व्यक्ती आधी आपल्या सुरक्षेचा विचार करते. कारण न्यायाच्या बाजून उभे राहण्यासाठी समाजाचाही पाठिंबा लागतो. या साक्षीदारांना एकाही समाजाचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी माघार घेणे चूकीचे नाहीच!
नितीन आगे या तरूणाची हत्या व्यक्तीगत कारणास्तव घडलेली नाही. तसेच ही हत्या मालमत्ता वगैरे आर्थिक कारणस्तव झालेली नाही. ही हत्या केवळ सामाजिक कारणास्तव घडलेली आहे. समाजातील उच्च-निच्च मानसिकतेमुळे म्हणजे जातीभेदामुळे घडलेली आहे. त्यामुळे कोणत्याही सद्सद्विवेक बुद्धीच्या व्यक्तीने व समतेवर विश्वास असलेल्या जाती-वर्गाने या घटनेनंतर कृतीशीलतेने व्यक्त होणे गरजेचे होते. मात्र तसे होतांना दिसले नाही. मोठ्या संख्येने लोक उदासीनच होते. काही वाचाळवीर फेसबुक-व्हाट्सपवर तलवारी चालवीत होते. आजही हवेत तलवारी फिरविणे चालूच आहे. या हत्यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्याचे धाडस एकमेव बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी केले. मात्र या मोर्च्याला 2000 पेक्षा जास्त लोक जमले नाहीत. खासदार भालचंद्र मुणगेकरांच्या पाठीशी केवळ 8-10 तरूण होते, तरीही त्यांनी धरणे आंदोलन करून सरकारला सुप्रिम कोर्टात अपील करण्यास भाग पाडले. मात्र यातून दोन प्रश्न उभे राहतात.
पहिला प्रश्न हा की, समाज न्यायासाठी संघर्ष करणार्या नेत्यांच्या पाठीशी का उभा राहात नाही? काय समाज उदासीन झाला आहे? परंतू तो उदासीन नाही. तो जर उदासीन असता तर चैत्यभुमीवर, दीक्षाभुमीवर वा क्रांतीभूमीवर (फुलेवाडा) लाखोंच्या-हजारोंच्या संख्येने तो जमा झाला नसता! 14 एप्रिल व 11 एप्रिल धुमधडाक्यात करोडो रुपयांचा चुराडा करीत साजरे झाले नसते!
31 डिसेंबर 1926 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजावर अन्याय होत असल्याबद्दल खुप अभ्यास केला, चिंतन केले ते लिहूनही काढले. बर्याच ठिकाणी जाऊन भाषणे केलीत. मात्र केवळ भाषणे करून, पुस्तके लिहून समाज जागृती होणार नाही, तर संघर्षासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल हे त्यांना पक्के ठाऊक होते. ते 1 जानेवारी 1927 ला भीमा-कोरेगावला गेले. स्तंभाच्या आत सामावलेले महार रेजिमेंटचे शौर्य त्यांनी आपल्या मनात साठवले. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी महाड चवदार तळ्याचा संघर्ष सुरू केला. या लढाईचा ‘हर हर महादेव’ करतांना त्यांनी आपल्या समाजाला उद्देशून केलेल्या महाडच्या भाषणात ते म्हणाले की, आपले पूर्वज आपल्यावर होणार्या अन्यायाच्या विरोधात शौर्याने लढलेत. भीमा-कोरेगावचा स्तंभ या शौर्याची साक्ष देत आहे. पण आज हे शौर्य कुठे हरवले आहे? असे हिन जीवन जगण्यापेक्षा तुम्ही आईच्या गर्भातच मरून का गेले नाहित? आपल्या पूर्वर्जांच्या शौर्यांचे स्मरण करा. आणी समतेच्या लढ्यात उतरा!’
‘हिन जीवन जगण्यापेक्षा तुम्ही आईच्या गर्भातच मरून का गेले नाहीत, असा प्रश्न आज पुन्हा विचारण्याची वेळ आलेली आहे का? भोतमांगे, नितीन आगे, वेमुला, रावण तसेच दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, असे आणखी किती बळी गेले म्हणजे आम्ही जागे होणार आहोत? काय चैत्यभुमी, दिक्षाभुमी, भीमाकोरेगाव, फुलेवाडा हे प्रेरणास्थळं राहीली नाहीत? ही स्थळं आता केवळ जत्रास्थळं झाली आहेत काय? की आमच्यातला फुले-आंबेडकरी ‘अनुयायी’ मेला? की आम्हीच आता भक्तीमार्गाला लागलो आहोत? भक्तीच करायची तर मग पुन्हा मरीमाय चा जागर-गोंधळ घातला पाहिजे!
बस्स! खूप झाल्या आता फेसबुक-व्हॉट्सपवरच्या डरकाळ्या! आता कृती कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही. लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला कृती केलीच पाहिजे. नितीन आगे प्रकरणात सुरूवातीपासून आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यासाठी पुढील टप्प्यात आंदोलनाची सुरूवात करीत आहोत. दैनिक लोकमंथनने नितीन आगे प्रकरणात सुरूवातीपासून आक्रमक भुमिका घेतली आहे. लोकमंथनच्या याच भुमिकेचा विस्तार करीत आम्ही
पुढिल वाटचाल करीत कार्यक्रम ठरविला आहे. तो पुढीलप्रमाणे-1)नितीन आगेच्या खून्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा केवळ घोषणा व डरकळ्या फोडून उपयोग नाही. नितीनच्या खून्यांना फाशीची शिक्षा कोर्ट देईल आणि कोर्ट फक्त साक्षीदारांचे म्हणणे ऐकते, आपल्या डरकाळ्या नाही. म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे.
2) यासाठी ‘एक विनंती कृती समिती’ स्थापन करण्यात येत असून यात फक्त 100 जणांची निवड करण्यात येणार आहे.
3)ही विनंती कृती समिती खर्डा गावाला जाईल व नितीन आगेच्या खून प्रकरणातील साक्षीदारांना भेटून प्रथम त्यांचे अभिनंदन व नंतर विनंती करणार आहे. अभिनंदन यासाठी की, त्यांनी मोठे धाडस दाखवून स्वेच्छेने पोलीस स्टशनला जाऊन आरोपींच्या विरोधात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जाबजबाब नोंदविले आहेत. म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात यईल.
4)नंतर त्यांना विनंती करण्यात येईल की, ‘आपण आता सुप्रिम कोर्टात कुणालाही न घाबरता न्यायाच्या बाजूने साक्ष द्या व खुनी लोकांना फाशीची शिक्षा देण्यात कोर्टाला सत्य ते सांगून सहकार्य करा.
5)आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून तो पूर्णपणे लोकशाही मार्गा ने केला जाईल.
6)ज्यांना या विनंती कृती समितीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी मुंबईत होणार्या बैठकीस उस्थित राहावे.