Breaking News

जिल्हा स्टेडियम खेळाडुसाठी 15 फेब्रुवारी पर्यंत खुले न झाल्यास आंदोलन-खेळाडंचा ईशारा

बीड,दि. 10 - जिल्हा क्रिडा कार्यालयाने गत दोन वर्षापासून अंतर्गत सुधारणेच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुलात खेळांडुना खेळण्यासापून वंचित ठेवले आहे. ते 15-02-2016 पर्यंत खेळाडुसाठी खुले करावे नसात 16 फेब्रुवारी पासून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा बीड मधील खेळाडू व क्रीडा प्रेमींनी दिली आहे.
            बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाची उभारणी ही बीडमधील विविध खेळांडूचया क्रीडा विकास व खेळाच्या विभागीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धा व्हाव्यात यासाठी करण्यात आलेली आहे. परंतू गत दोन वषाृपासून अंतर्गत सुधारणेच्या नावाखाली जिल्हा क्रिडा संकुलात खेळाडुंना खेळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडंची गैरसोय होत आहे. बीडमध्ये दरवर्षी होणार्‍या विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आयोजकांना अडचणी येत आहेत. जिल्हा क्रीडा संकुलावर विविध क्लबच्या वतीने क्रिट, फुटबॉल, आदी स्पर्धा गत दहा वर्षापासून घेण्यात येतात. मात्र सध्या त्याम्धये खंड पडला आहे. त्यामुळे हे क्रिडा संकुल खेळाडु व खेळासाठी खुले करावे अशी मागणी होत आहे. 15-02-2016 पर्यंत जिल्हा क्रिडा संकुल  खेळाडूसाठी खुले न केल्या 16-02-2016 पासून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाची सुरूवात 16-02-2016 पर्यंत जिल्हा क्रिडा संकुल येथे आमरण उपोषण सुरू करून करण्यात येईल असा ईशाराही खेळाडू व क्रीडा प्रेमी नागरीकांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धस देण्यात आलेल्या निवेदनावर सर्वश्री.राजू जाधव, किशोर जगताप, संतोष (लारा) वाघमारे, संजय सोनवणे, सय्यद शाकेर, राहुल कागदे, बाळासाहेब घुमरे, अ‍ॅड.धमेंद्र भोपाळे, अ‍ॅड.प्रशांत माने, हनुमान ईनकार, आदी विविद क्रिकेट क्लबच्या अध्यक्षांच्या स्वाक्षर्‍या असून हे निवेदन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री ना.विनोद तावडे, पलकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, जिल्ह्याच्या खासदार व सर्व आमदार यांना देण्यात आले असल्याचेही प्रासिद्धी पत्रकात म्हटले आहे.