Breaking News

प्रत्येक देशाला इसिसचा धोका - पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

औरंगाबाद, 17 - मुंब्रा व औरंगाबादेत सुद्धा संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा धोका टाळण्यासाठी देशातील तरुणांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करा. त्यांना हा समाज आपला वाटावा असे वातावरण निर्माण करण्याची गरज महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी येथे प्रतिपादीत केली.
दहशतवादी संघटनांच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत म्हणून पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर समुपदेशानाची कारवाई करण्यात येते. शाळा, महाविद्यालये, मदरसा अशा संस्थांत पोलिस अधिकारी चर्चा करून तरुणांना अशा प्रवृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दीक्षित म्हणाले. मालेगाव, भिवंडी, उस्मानाबाद, कोकण, औरंगाबाद या भागात प्रभावीपणे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.