एसी केबिनमध्ये बसून योजना आखणे सोपे असते : अणे
मुंबई, 17 - राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंबईच्या एसी केबिनमध्ये बसून योजना आखणे फार सोपे आहे. मात्र, वास्तविक त्या प्रत्यक्षात जाऊन त्याठिकाणी राबवणे हे एक आव्हान असते. अस मत अणेंनी शेतकर्यांच्या आत्महत्यांबाबत राज्य सरकारची बाजू मांडताना व्यक्त केले.
शेतकर्यांच्या आत्महत्यांबाबत मुंबई हाईकोर्टात दाखल सु मोटो याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत 2016च्या अवघ्या दीड महिन्यांत राज्यभरात 124 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक कबुली सरकारनं दिली. ज्यात औरंगाबादमध्ये 89 तर उस्मानाबाद जिल्ह्यात हा आकडा 20 असल्याचीही माहीती समोर आली आहे.