Breaking News

शिवरायांच्या पुतळ्यावरुन राज ठाकरेंची टीका

पुणे, 17 - ‘केवळ पुतळे उभे करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.’ असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केले आहे.  
ते पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आज बोलत होते.  अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुनही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अश्‍वारुढ पुतळा तोही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा ही कल्पना कुणाच्या मनात सुचली काय माहिती?’ असे म्हणत राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी देखील पुतळे आणि स्मारके याला विरोध केला आहे.