राज्यात दहावीची परीक्षा सुरु
मुंबई, 01 - शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडण्याच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉइंट’ समजली जाणारी दहावीची लेखी परीक्षा आजपासून सुरु होत आहे. राज्यभरात जवळपास साडे सतरा लाख विद्यार्थी एसएससीच्या परीक्षेला बसणार आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत राज्यातील परीक्षा घेतली जाते. या विभागां अंतर्गत 4 हजार केंद्रांवर परीक्षा व्यवस्था केली आहे. मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी सात याप्रमाणे 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत.