पेट्रोलच्या दरात कपात, मात्र डिझेल महागले
मुंबई, 29 - पेट्रोलमध्ये प्रती लिटर 3.02 पैसे आणि डिझेलच्या किंमती 1.47 महाग झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घटीमुळे पेट्रोलियम पदार्थाच्या किंमतीत बदल करण्यात आले.
बदललेल्या किंमतीनुसार, मुंबईत पेट्रोल 62.75 रुपये लिटर तर डिझेस 53.06 रुपये प्रति लिटर उपलब्ध होईल. तर राजधानी दिल्लीत मात्र पेट्रोलसाठी 56.61 रुपये प्रति लिटर आणि डिझेलसाठी 46.43 रुपये प्रति लिटर मोजावे लागतील. बाजार भावानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निर्धारित करण्यात येतात. प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला किंमतींमध्ये बदल करायचे किंवा नाही याचा निर्णय राज्यातील तेल कंपन्या घेतात. इंडियन ऑईल कॉर्प, भारत पेट्रोलियम कॉर्प आणि हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्प किंमती निर्धारीत करतात.