पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातून दोन सराईत गुन्हेगार तडीपार
पुणे (प्रतिनिधी)। 09 - दोन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातून दोन वर्षांषासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
या प्रकरणी राहुल बाबुलाल भाटी (वय 32, रा. सोमवार पेठ) आणि सुशांत ऊर्फ मटया शशिकांत कुचेकर (वय 20, रा. नाना पेठ) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे.
पुणे शहर, पुणे जिल्हा आणि मनमाड (जिल्हा- नाशिक) या भागांमधून दोन वर्षांसाठी या दोघांना तडीपार करण्यात आलेले आहे. राहुल भाटी विरुद्ध एकूण 5 गुन्हे यामध्ये खून, मारामारी, गंभीर दुखापात, घातक हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुशांत उर्फ मटयावर विरुद्ध एकूण 7 गुन्हे यामध्ये दरोडा, गंभीर दुखापत, घातक हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत तांबे (लष्कर विभाग) पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, समर्थ पोलीस ठाणे पुणे शहर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर म्हेत्रे, पोलीस हवालदार रफिक सय्यद, पोलीस नाईक अजित शिंदे यांनी केलेली आहे.