Breaking News

हणमंतप्पा कोप्पड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 धारवाड/वृत्तसंस्था । 13 - वीर जवान हनुमंतप्पा  कोप्पड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बेटादूर या त्यांच्या मूळ गावी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली. लष्कराच्या अधिकार्‍यांनी त्यांना मानवंदना दिली. हनुमंतप्पांच्या कुटुंबीयांसह उपस्थित सर्वांना अश्रू अनावर झाले.
जगातील सर्वांत उंच लष्करी तळ असलेल्या सियाचीन येथील हिमस्खलनाच्या दुर्घटनेतून बचावल्यानंतर काल लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पड यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बर्फाखाली सहा दिवस गाडले जाऊनही चमत्कारिकरीत्या बचावलेले हनुमंतप्पा यांनी काल उपचारादरम्यान अखेरचा श्‍वास घेतला. हनुमंतप्पा यांचे पार्थिव हुबळी विमानतळावर काल आणण्यात आले. कर्नाटक इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेच्या इमारतीत त्यांचे
पार्थिव रात्रभर ठेवण्यात आले. सकाळी काही वेळ तेथील नेहरू स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते.