Breaking News

भूमी हक्क परिषदेचे आमरण उपोषण

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 09 - भुमी हक्क परिषदेच्यावतीने विविध मागण्यांबाबत सोमवार 8 फेब्रुवारी 2016 पासून संघटनेचे कार्यकर्ते व वनहक्कधारक महिला व पुरुष एकूण 75 अतिक्रमणधारकांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. 
माळेगांव वनग्राम या आदिवासी बहूल वनवस्तीला महसूल प्रशासनाने केलेल्या सर्व्हेनुसार महसूली दर्जा मिळावा तसेच सर्व प्रकारच्या मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, बुलडाणा जिल्ह्यासह मोताळा तालुक्यातील माळेगांव वनग्राम, तरोडा, जयपुर, वारुळी गुळभेली, खडकी, नळकूंड, रोहिणखेड येथील वन व महसूल जमीन अतिक्रमणधारकांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा वनहक्क कायद्याप्रमाणे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे कायम पट्टे देण्यात यावे. खैरखेड वनबीटमधील वनखनिजाची विना परवाना रेती व माती मोठ्या प्रमाणात चोरील गेली आहे. त्याचा शोध घेवून संबंधित वनअधिकार्‍यांवर कारवई करण्यात यावी, वनजमिनीवरील वनहक्क कायद्याप्रमण कायदेशिर अ
तिक्रमणधारकांना त्यांच्या ताब्यात असलेल्या वनजमिनीत मशगत करण्याबाबत वनविभागाने अडवणुक करु नये, वनहक्क दावेदाराच्या ताब्यात असलेल्या वनजमिनीच्या क्षेत्रात यंत्राने मशागत करण्याबाबत अडवणुक करता येत नाही. याबाबत वनहक्क कायद्याप्रमाणे उप-वनसंरक्षक यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यंना आदेशित करावे. यासह विविध 18 मागण्याबाबत सदरचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये संघटनेचे संस्थापक महासचिव रामकृष्ण मोरे, रामदास पंडीतकर, तुकाराम मोरे, अशोक गायकवाड, आत्माराम फुलमाळी, शेषराव गायकवाड यांच्यासह असंख्य महिला व पुरुष सहभागी झाले होते.