Breaking News

स्पर्धेत टिकण्यासाठी वेगळेपण जोपासा ः श्‍वेता खेडकर

  बुलडाणा (प्रतिनिधी)। 16 - सद्याचे युग स्पर्धेचे आहे. स्त्री पुरूष, गरीब, श्रीमंत, जात, धर्म, पंथ भेद विसरून खांद्याला खांदा लावून काम करण्याचा काळ आहे. आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी जिद्द, चिकाटी, कठीण परिश्रम करणाराच जीवनात यशस्वी होते. 
शाळा- महाविद्यालयातील संस्कारच जीवनात उपयोगी पडतात. सहकार विद्या मंदिराच्या अद्यायावत इंग्रजी माध्यमाच्या शाळा राधेश्याम चांडक यांनी सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने करा. ग्रामीण विद्यार्थ्यानी मानसिकता झटकून स्पर्धेत यावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक श्‍वेता खेडकर यांनी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय धाड येथील निरोप समारंभात केले. दि. 13 रोजी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय धाड येथे एस. एस. सी. व एच. एच.
सी विद्यार्थ्याचा निरोप समारंभ स्थानिक संचालक जिप सदस्य देविदास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलतांना श्‍वेता खेडकर म्हणाल्या. शहरी विद्यार्थ्यांपेक्षा आपण सरस आहो हे सिद्ध करा. स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करतांना त्यांनी स्वतःचे उदाहरण देऊन विद्यार्थ्याना विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे दिली. बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या प्रशासकीय अधिकारी सौ. नम्रता पाटील यांच्या हस्ते श्‍वेता खेडकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य वासुदेव बोरे यांनी शाळा व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख व राबविण्यात येणार्‍या निरनिराळया उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात दिली. ऋषीकेश रगड, विजया बरगडे, सरोज ाजपुरोहित, अभिषेक पालकर, कोल खरात, गोपी आघाव या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. देविदास जाधव, पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला स्थानिक संचालक दिपक मालवे, अ‍ॅड. संतोष खत्री, ए. पी. आय. सोनुने, पी. सी. सोकी, अर्बनचे उपविभागीय अधिकारी किरण शिरसाट, शाखाधिकारी अरूण जाधव, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर जोशी यांनी तर आभार अभिजित देशमुख यांनी मानले. इम्रान शेख, अनिल दळवी, प्रा. बिल्लारी, प्रा. सांगळे, प्रा. शेगोकार, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.