Breaking News

ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरा अन्यथा आंदोलन

  बुलडाणा (प्रतिनिधी)। 16 - स्वाभिमानी शेतकरी संघटना मोताळा तालुक्याचे वतीने आज दिनांक 9 फेबु्रवारी रोजी येथील ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे. याबाबत मोताळा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदनात नमुद आहे की, मोताळा तालुका हा क्षेत्रफळाच्या दूष्टीने जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. तालुक्यात 120 गावे आहेत. मोताळा शहरामध्ये ग्रामीण रूग्णालयाची फक्त प्रशस्त इमारत बांधलेली असुन ती फक्त शोभेची वस्तु म्हणून आज रोजी उभी आहे. रूग्णालयामध्ये एम.बी.बी.एस 3 व एम.एस 1 असे एकूण 4 पदे रिक्त असल्याने रूग्णांची फार मोठी हेळसांड होत आहे. येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांना डॉक्टर नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. या बाबींकडे गाभींर्याने लक्ष देऊन ही पदे तात्काळ भरण्यात यावी, अन्यथा दिनांक 17 फेबु्रवारी 2016 पर्यंत वरील पदे न भरल्यास रूग्णालयाच्या धतावर बसुन थाली बचाओ आदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. सदर निवेदनावर राणा चंदन, जिल्हाध्यक्ष वि.आ.महेंद्र जाधव युवा तालुकाध्यक्ष, दत्ता पाटील, ज्ञानदेव हरमकार, सैय्यद वसीम, राजेश पडोळकर, संजय गरूडे, विठ्ठल पन्हाळकर, मंगेश गोळे, गंगाधर तायडे, पुंडलीक हरमकार, लखण सपकाळ आदींच सह्य आहेत.