Breaking News

येवला शहराला दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा नगरपालिकेचा निर्णय

येवला, 16 -  नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस पुरविण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 15 फेब्रुवारीपासून येवला शहराला दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ 15 द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक आहे.
 हे पाणी आगामी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवण्याचे आव्हान असले, तरी मार्चमध्येच शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण होणार असल्याचे चित्न आहे. येवला शहरातील साठवण तलावात सध्या उपलब्ध साठयातून येवला शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, मुख्या
धिकारी डॉ. राहुल वाघ, अभियंता जे. बी. फुलारी यांनी केले आहे. तसेच नळांना तोट्या बसवाव्या, नादुरुस्त नळ तातडीने दुरुस्त करून घ्यावे. टंचाई काळात उपलब्ध पाणीसाठयाचा आढावा घेऊन पुढील कालावधी वाढविण्यात येईल, असेही पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.