चौपाटीवर कार्यक्रम घेण्याचा हट्ट भोवला; कउ ने का नाकारली होती परवानगी
मुंबई, प्रतिनिधी, दि. 16 - गिरगाव चौपटीवर रविवारी संध्याकाळी महाराष्ट्र रजनी कार्यक्रम सुरू असताना आग लागली आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पण आता दुर्घटनेच्या कारणांचा शोध सुरू असताना मुळात, राज्य सरकारने याच ठिकाणी कार्यक्रम व्हावा यासाठी हट्ट धरला नसता तर कदाचित हा अनर्थ टळू शकला असता का.. असे प्रश्न अनेकांच्या मनात येत आहेत.
अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे हायकोर्टाने गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर सुप्रीम कोर्टातून त्यासाठी सरकारने परवानगी मिळवली होती. फायर डिपार्टमेंटनेही शनिवारी फटाके न उडवण्याचा इशारा दिला होता. पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. कार्यक्रमात फटाके उडवण्यात आले. फायर मशीन्सचा वापर झाला. आगीचे
नेमके कारण लवकरच समोर येईल. पण सध्यातरी हायकोर्टाने परवानगी नाकारणे योग्य होते, की काय असे वाटत आहे.