Breaking News

ब्रेन डेड तरुणाच्या अवयवदानाचा निर्णय

औरंगाबाद, 22 - जालना जिल्ह्यातील विरेगाव-रांजणी रस्त्यावर रामभाऊ रंगनाथ उबाळे (वय 28, रा. वाई, जि. जालना) याचा अपघात झाला. वैद्यकीय तपासण्यांनंतर डॉक्टरांनी ब्रेन डेड‘ असल्याचे नातेवाइकांना कळविले. नातेवाइकांनी लगेचच त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. 
याबद्दल रामभाऊ याचे धाकटे बंधू लक्ष्मण यांनी याबाबत माहिती दिली. रामभाऊ याचा गुरुवारी  रात्री विरेगाव-रांजणी (जि. जालना) मार्गावर दुचाकीवर अपघात झाला. एका वाटसरूने त्याला औरंगाबाद येथील लाइफलाइन मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले. रामभाऊ याच्या खिशामध्ये असलेल्या कागदपत्रांवरून रुग्णालयाने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. उपचारांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद रामभाऊकडून मिळत नव्हता. त्याचा ब्रेन डेड असल्याचे व कोठेही उपचार शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना अवयवदानाचा पर्याय सुचविला.