Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

औरंगाबाद, 22 - गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मान्यताप्राप्त शाळेचाच पत्ता लागत नसल्याने मराठवाड्यातील दहावीतील 971 विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्यातरी अंधारात आहे. शाळा, मुख्याध्यापकांचा शोध घेण्यासाठी मंडळासह शिक्षण विभागही हैराण झाला आहे. 
शिक्षण मंडळातर्फे एक मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत असून, प्रात्यक्षिक परीक्षाही पूर्ण झाल्या आहेत. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही शाळांमार्फत मिळालेली आहेत. परंतु, केकरजवळा (ता. मानवत, जि. परभणी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय आश्रमशाळेचा पत्ताच मिळत नसल्याने तेथील 971 विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत. प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली गेलेली नाही.