पायीची वाहन पायीच बरी
बीड,दि. 10 - जगदगुरू संत तुकोबाराया हा अभंग आहे. त्याचे असे झाले की, आपल्या गेवराई तालुक्यातील त्याकाळातील धरणेकर आडनावाचे एक निःसीम भक्त तुकाराम महाराजांजवळ मला उपदेश करा म्हणुन ठाण मांडून बसले असता तुकोबारायांनी धरणेकर्यास संत ज्ञानेश्वर महाराजांकडे पाठविले.
संत हे कालातीत असतात त्यांनी धरणेकर्यास परत तुकोबारायाकडे पाठविले.तेव्हा तुकोबाराया संत ज्ञानेश्वरास विनवितात मज पामरा हे काय थोरपण पायीची वहान पायीच बरीअसा विनयशील व नम्रतापुर्ण अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा ब्र.गोविंदपंत श्री समाधी क्षेत्री भजप पंचपदीच्या निमित्ताने मृदंग विशारद ह.भ.प.चंद्रकांत म.शेळके यांनी आपल्या सुरेल आवाजात गायला त्यांना स्वर वा दिनीवर ह.भ.प. रामचंद्र कागदे गुरूजीनी साथ दिली तर गायनासाठी सर्वश्री ह.भ.प.सुधाकर खजिनदार, जगदिश वेताळ, सुखदेव शिंदे, विजय कापडणे, आसाराम चव्हाण, सुरेश गेदंले, शिवमुर्ती आदे, संदिप पवार यांनी चढाओढीने साथ केली.बैठक व्यवस्था तथा चहापन व्यवस्था संस्थानचे चोपदार अर्जुन शिंदे तथा पुजारी प्रतापसिंह राजे निंबाळकर यांनी चोख सांभाळली शेवटी ज्ञानदेव तुकाराम च्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.