Breaking News

वीज महावितरणची हजारोंची अवास्तव बिले; गिरणारेत संभ्रम

नाशिक/प्रतिनिधी। 16 -  वीज महावितरण कंपनीने डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात घरघुती ग्राहकांना हजारोंची अवास्तव बिले आकारली आहे .दर महिन्याला हाती पडणारे घरघुती 300 ते 500 रुपयाचे वीजबिले थेट 5 हजार ते 7 हजारांचे आल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत .या संदर्भात स्थानिक तसेच सातपूर एम. आय. 
डी. सी. वीज विभागाच्या कार्यालयात संपर्क केल्यावर वीज अधिकार्‍यांनी वाढीव वीजबिल हे पूर्वीची अंदाजे दिल्याने एकदाच आकारल्याचे सांगितले 
यावेळ एकदाच बिले आकारून आमच्यावर आर्थिक बोजा कशाला? दरमहिन्याला रीडिंग घेतली जात असतांना वीजमीटर चे फोटो बिलावर येत असताना अंदाजे बिले कशी वीज वितरण आकारते? असा सवाल वीज ग्राहकांनी केल्यावर अधिकार्यांनी थेट रीडिंग घेणार्‍या एजन्सीला विचारा असा प्रश्‍न करून वेळ मारून नेली .यामुळे दर महिन्याला वीजबिले भरणार्‍या ग्राहकांची वीज वितरण विभागाने एक प्रकारे हजारोंची बिले एकदाच आकारून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक व फसवणूकच केली असल्याचे वीज ग्राहकांनी सांगितले.  
वीज मंडळाचे वीज वितरण कंपनीत विभाजन झाल्यावर 3 महिन्याला येणारी घरघुती वीजबिले आता महिन्याला यायला लागली.  महिन्याचे एकूण बिल जितके यायचे तितकेच वीजबिल महिन्याला यायला लागली ,त्यात अधिभार वीजगळतीचा बोजा ,स्थिर आकार बोजा ग्राहकावर लादला गेला आहे.