पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवल्याने विराट कोहलीला दंड
मुंबई, 29 - टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे. आयसीसीने विराटला मानधनाच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे.
शनिवारी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकाच्या सामन्यात विराट 49 धावांवर पायचीत झाल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. त्यावर विराटने नापसंती दर्शवली होती. विराटने आपल्याकडून आयसीसीच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे मान्य केले असून, सामनाधिकारी जेफ क्रो यांनी त्याला सामन्यातील मानधनाच्या तीस टक्के दंडाची शिक्षा सुनावली आहे.