Breaking News

88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्पॉटलाईट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान

लॉस एन्जल्स, 29 - हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या 88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्पॉटलाईट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. तर, लिओनार्डो दी कॅप्रिओ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि ब्री लार्सन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द रेव्हनंट या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने देण्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. ख्रिस रॉक हे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
सर्वोत्कृष्ट अभिनेता - लिओनार्डो दि कॅप्रिओ (द रेव्हनंट) , सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ब्री लार्सन (रुम), सर्वोत्कृष्ट चित्रपट : स्पॉटलाईट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अलजॅन्ड्रो इनारोटू (द रेव्हनंट), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मार्क रायलान्स (ब्रिज ऑफ स्पायसेस), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अलिशिया विकॅन्डर (डॅनिश गर्ल), सर्वोत्कृष्ट मूळ गीत : रायटिंग्ज ऑन द वॉल, सर्वोत्कृष्ट पटकथा - स्पॉट लाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा - द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अ‍ॅडम मॅके), सर्वोत्कृष्ट वेशभूषा - जेनी बिव्हन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल: लेस्ली वेंडरवॉल्ट (मॅड मॅक्स फ्युरी रोड), सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - एमॅन्यूएल लुबेस्की (द रेव्हनंट), सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - मॅड मॅक्स फ्युरी रोड, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - मार्क मँगिनी आणि डेव्हिड व्हाईट (मॅड मॅक्स फ्युरी रोड), सर्वोत्कृष्ट ध्वनीमिश्रण - ख्रिस जेन्किन्स (मॅड मॅक्स फ्युरी रोड), सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड), सर्वोत्कृष्ट व्हिज्यूएल इफेक्ट्स - एक्स माचिना, सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुकथा - गॅब्रियल ओसोरियो व पॅटो एस्काला (बिअर स्टोरी), सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट - इनसाईड आऊट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मार्क रायलान्स (ब्रिज ऑफ स्पायसेस), सर्वोत्कृष्ट माहितीपट - असिफ कपाडीया, जेम्स गे-रीस (ऍमी), सर्वोत्कृष्ट माहितीपट - असिफ कपाडीया, जेम्स गे-रीस (एॅमी), सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन लघुकथा - स्टुटेरर, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर (मूळ संगीत) : एनीयो मॉरिकोनी (द हेटफुल एट), सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट : हंगेरीचा ‘सन ऑफ सोल.