Breaking News

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

नवी दिल्ली, 23 -  आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. दोन टप्प्यात होणार्‍या या अधिवेशनाचा पहिला टप्पा 23 फेब्रुवारी ते 16 मार्च, तर दुसरा टप्पा 25 एप्रिल ते 13 मे असा असणार आहे. 
अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी काल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसात रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, जेएनयूचा वाद यासारख्या विषयावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आगामी अधिवेशनात संसदेचे कामकाज चालू देण्याचे आश्‍वासन काँग्रेसने दिले आहे. त्यामुळे या अधिवेशन कसे पार पडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.