अतिक्रमण धारकांसाठी आंदोलन उभारणार ः हंडोरे
बुलडाणा (प्रतिनिधी) । 23 - जीवन जगण्याचे माध्यम प्रत्येकाकडे असावे, सर्वांना समान अधिकार असावे, जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेता कामा नये असे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत होते. परंतू दलीत समाज आजही हक्कापासून दुर आहे.
काही ठिकाणी उदरनिर्वाहासाठी समाज बांधवांनी अतिक्रमणीत जमीनी काढून त्यावर आपला उदरनिर्वाह 25 वर्षांपासून सुरु केला आहे. परंतू अद्यापही त्यांना मालकी हक्क प्राप्त झालेला नाही. शासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. अतिक्रमण धारकांना मालकी हक्क प्राप्त व्हावा यासाठी भिमशक्तीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभे करुन शासनाला जमिन अतिक्रमण धारकांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यास भाग पाडू असे प्रतिपादन माजी सामाजीक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. स्थानिक गर्दे सभागृहात भिमशक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हाते. या प्रसंगी ते बोलत होते.
गायराण, अतिक्रमणधारक भुमीहिनांच्या प्रश्नावर भिमशक्ती संघटनेचा जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उद्घाटक म्हणुन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी विदर्भ संघटक साहेबराव गवई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद रत्नपारखे, कैलास सुखदाने, दिलीप भोजराज, प्रमोद साळोख, नंदु मोरे, दिपक मोरे, भाऊ सुरवाडे, कांतीलाल बोरुडे, बाळासाहेब भदर्गे, माजी सभापती दिलीप जाधव, रमेश गायकवाड, एस.एस. वानखेडे, अॅड. प्रताप वानखेडे, अविनाश मिसाळ, रेखाताई गवई यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, सर्वांनी नैतीक मार्गाने प्रगती करावी, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आोंडकरांना अपेक्षीत होते. प्रत्येक माणंसाना जिवन जगण्याचा हक्क आहे आणि हक्क मिळत नसेल तर संघर्षाच्या माध्यमातुन काम केले पाहिजे. त्यामुळे जमिनी धारकांचा प्रश्न वार्यावर सोडून जमणार नाही तर तो धसास लावण्यासाठी शासनाशी संघर्ष करण्याची वेळ आली तरी आपण मागे हटणार नाही. यासाठी भिमशक्ती संघटनेच्या माध्यमातुन अतिक्रमीत जमिनीचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. ज्या जमिनी अतिक्रमण धारकांच्या ताब्यात आहे. त्या जमिनीचा कायम सात बारा भोगवटदाराच्या नावे झाला पाहिजे असेही ते म्हणाले व अतिक्रमण धारकांसाठी स्वत: रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
प्रास्ताविक भिमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल इंगळे यांनी केले. तसेच भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांनीही प्रसंगी विचार मांडले. भाई कैलास सुखदाने, माजी जि.प.सभापती दिलीप जाधव, भाऊ सुरवाडे, दिलीप भोजराज आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन अॅड. प्रतापराव वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक मोरे यांनी केले. यावेळी भिमशक्ती संघटनेमध्ये प्रवेश करण्यात आला. यामध्ये इंगळे, अॅड. वानखेडे, नंदू मोरे, दादाराव पगारे यासह अनेकांनी प्रवेश घेतला. यामेळाव्यास जिल्हाभरातुन शेकडो स्त्री पूरुष उपस्थित होते.