Breaking News

निराधारांना पेन्शन योजना मंजूर करावी

नाशिक, 09 - बेळगाव ढगा येथील संजय गांधी निराधारांना पेन्शन योजना लागू करून त्वरित मंजूर करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. 
निवेदनात म्हटले की, बेळगाव ढगा येथील वृद्ध, अपंग, विधवा यांचे संजय गांधी पेन्शनचे  15 लाभार्थी प्रकरणे मंजूर असून, ही त्यांना पेन्शन मिळत नाही. त्याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, निवेदनावर राजू देसले, रमेश ठाकूर आदिंसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.