मालेगांव बॉम्बस्फोटातील आरोपींना जामीन देण्यासाठी केंद्राकडील प्रस्ताव फेटाळावा ः मागणी
अहमदनगर । प्रतिनिधी । 09 - मालेगांव बॉम्ब स्फोटातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी केंद्रीय कायदा मंत्रीकडे मागविण्यात आलेला अभिप्राय फेटाळून लाऊन आरोपींना जामीन देऊ नये या मागणीसाठी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन सादर करीत निदर्शने केली.
यावेळी अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रज्ञा सिंग आणि इतर आरोपींना जामिन देवु नये, मालेगांव स्फोटातील आरोपींना जामिन देऊ नये यांना जामिन देण्यासाठी केंद्रामध्ये हालचाली सुरु असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.
अन्यथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष फिरोज शफी खान समवेत मुन्नाशेठ चमडेवाले, डि.जी.भांबळ, शारदा वाघमारे, हनिफ शेख, बाळासाहेब भुजबळ, श्यामराव वाघस्कर, मोबीन शेख, संध्या मेढे आदी आदिनी निदनाव्दारे दिला आहे.