Breaking News

राज्यस्तरीय ‘जश्‍ने गौसे-ए-आजम व महेफीले शब’ धार्मिक परिषद

नाशिक/प्रतिनिधी। 09 -  समाजात बळावत चाललेल्या वाईट प्रथा व प्रवृत्ती हद्दपार करून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी सुफी संतांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणल्याशिवाय सुसंस्कृत समाज व एक सच्चा मुसलमान घडणे अशक्य आहे. सुफी संतांनी दाखवलेले सत्याच्या मार्गानुसार व त्यांनी दिलेली इस्लाम धर्माची शिकवणींचा ठेवा सदैव सोबत बाळगल्यास जिवनातील अनंत अडचणी दूर होतील,असे असे प्रतिपादन मुफक्कीरे मिल्लत हजरत सय्यद अली अशरफ अशरफी जिलानी यांनी केले.
अल अशरफ फाउंडेशनच्या वतीने शहरातील पखाल रोडवरील अशरफ नगर येथे झालेल्या जश्‍ने गौसे-ए-आजम व महेफीले शब या  धार्मिक परिषदेत हजरत सय्यद अली अशरफ जिलानी मागदर्शन करताना बोलत होते. परिषदेत राज्यभरातील अन्य मुस्लिम धर्मगुरुंनी उपस्थिती राहून धार्मिक व सामाजिक मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मालेगावचे मौलाना इफ्तेखार जामी अशरफी, हाफीज समदानी साहब, सुफी अब्दुल लतीफ साहब, मौलाना फहीम साहब, मौलाना एजाज साहब, हाफीज हिलाल साहब, मौलाना जुबेर अहमद, मौलाना मुफ्ती साहिल परवेझ अशरफ, मौलाना हुसेन, फौलाना फहीम आदी उपस्थित होते. 
मौलाना मुफ्ती साहिल परवेझ अशरफ यांनी बोलतांना सांगितले की, निष्पाप व निरपराधांना ठार मारणे माणुसकीची हत्या करण्यासारखे आहे. इस्लाममध्ये असे कृत्य करणे निषिद्ध असून, प्रेषिद महंमद पैगंबरांनी त्यापासून दूर राहण्याचे बजावले आहे. जगभरातील मुस्लिमांवर त्यांच्या तत्त्वांची जोपासना करण्याची जबाबदारी आहे. तसेच धर्मग्रंथामधील विचार समजून न घेतल्याने अनेकदा गैरसमज होतात आणि त्यातूनच संघर्षांचे प्रकारही उद्भवतात. पवित्र कुराणातील तत्त्वे ही चांगले जीवन जगण्यासाठी दिशादर्शक असून त्यातले सत्य जाणले पाहिजे, असे प्रतिपादन मालेगावचे मौलाना इफ्तेखार जामी अशरफी यांनी केले. मुफक्कीरे मिल्लत हजरत सय्यद अली अशरफ जिलानी यांनी भारतासह जगभरात शांतता व समृद्धी नांदो, मानवी मूल्यांची जोपासना करण्याचे आत्मिक बळ सर्वांमध्ये निर्माण होवो, अशी सामूहिक प्रार्थना करीत परिषदेची सांगता केली.