स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिंदखेड राजा तालुका निर्मल ग्राम उद्दीष्टाकडे
सि.राजा (प्रतिनिधी) । 09 - सिंदखेड राजा तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेले शौचालय बांधकाम मिशन जवळजवळ पुर्णत्वाकडे आले आहे. स्वच्छता मिशन कक्ष जि.प.बुलडाणा यांच्या आदेशानुसार उद्दिष्टानुसार 2408 पैकी 1527 शौचालयांचे बांधकाम जानेवारी अखेर पूर्ण झाले असून मार्च अखेर उर्वरित 981 शौचालयांचे काम पूर्ण होणार आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता या शासन स्तरावरुन ग्रामीण भागात माता-भगिणींच्या आत्मसन्मानाप्रती आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीने व आपले गांव ङ्गस्वच्छतेचे तीर्थक्षेत्रफ होण्यासाठी स्वच्छ भारत अभियानात वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी रुपये 12 हजार इतकी भरघोस वाढ 2 ऑक्टोबर 2014 पासून प्रोत्साहनपर बक्षिसासाठी करण्यात आली आहे. या अनुषंगाने जि.प.ने पंचायत समितीला 2408 शौचालयाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार स्वच्छ भारत अभियान कक्षाचे कैलास जायभाये व रामराव दुतोंडे यांनी कामात तत्परता दाखवत जानेवारी अखेर 1527 शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यश मिळविले आहे. तर उर्वरित 981 शौचालयांचे बांधकाम मार्च अखेर पूर्ण होणार असल्याचे स्वच्छता अभियाने कक्षा सांगितले. आंबेवाडी,
भंडारी, भोसा, देवखेड, ढोरव्ही, गोरेगाव, हनवतखेड, कंडारी, जागदरी, लिंगा, पिंपळगाव सोनारा, पळसखेड बु., वरुडी, पोफळ शिवणी, रताळी, ताडशिवणी, वसंतनगर, वडाळी, वाघजाई, वाघोरा आदी गावांमध्ये सध्या शौचालय बांधकाम प्रगतीपथावर आहे. यापैकी वाघोरा, वसंतनगर या गावांमध्ये 100 टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहे. तर पिंपरखेड बु. व आडगाव राजा ही गावेसुद्धा हगणदरी मुक्त झाल्यासारखेच असून ती प्रशासकीय यंत्रणेत अडकली आहेत. स्वच्छता भारत अभियानाचे क्षमता बांधणी सल्लागार संतोष साखरे यांच्या पथकाने नुकतीच आडगावराजा व वडाळी या गावांना भेट देवून शौचालयांसंबंधी माहिती दिली. तसेच हगणदरीमुक्त गाव होण्यासाठी शौचालयांचे बांधकाम करुन वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत स्वच्छ भारत अभियानाचे कैलास जायभाये व रामराव दुतोंडे उपस्थित होते.