महाराष्ट्र दारुमुक्त केल्यास गुन्हेगारी घटेल - वारकरी महामंडळाचा दावा
नाशिक/प्रतिनिधी। 09 - महाराष्ट्रात मुक्त दारुमुळे खेड़ी व शहरे असुरक्षित झाली आसुन,वाढत्या व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम पुढील अनेक पिढ्यांवर होणार आहे. वाढत्या दारुमुळे महाराष्ट्र दारुमुक्त केल्यास राज्यातील गुन्हेगारी व अपघात व् व्यसनामुळे होणारे आजार निश्चित् घटतील, याकामी राज्य शासनाने
तातडीने महाराष्ट्र दारुमुक्त करावा अन्यथा वारकरी महामंडळ राज्यभर तीव्र आंदोलने करतील असा इशारा महाराष्ट्र वारकरी महामंडलाचे राज्याध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ यांनी श्री क्षेत्र त्र्यम्बकेश्वर येथे बैठकीत दिला.
त्र्यम्बकेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या संत निवृत्तिनाथ महाराज पौष वारीत वारकरी महामंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी समोर ते बोलत होते,यावेळी वारकरी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष तथा वारकरी प्रबोधन समितीचे प्रमुख रामेश्वरशास्री यांनी व्यसनमुक्ति दारुबंदी साठी अखंडपणे वारकरी राज्यभर कीर्तन प्रवचनातून व्यसंनमुक्तिसाठी प्रबोधन करतात, मात्र वाढत्या व्यसनाधिनतेला आता रोखावे लागेल त्यासाठी महिला झटतात, ग्रामसभेचे ठराव करतात प्रसंगी दारू माफियांकडून अनेकदा दंमदाटया मारहानि होतात,महिला मुलांचा व्यसनी व्यक्तिकडून अमानुष छळ होतो, अश्या अनेक घटनांचे मूळ दारू आहे, महाराष्ट्रात दारुबंदी काळाची गरज आहे, याप्रसंगी वारकरी महामंडळाचे जिल्हाप्रमुख ह.भ.प.पंडित महाराज कोल्हे, सम्पर्कप्रमुख श्रावण महाराज अहिरे,लहानु पाटिल पेखले, वाळके गुरूजी, प्रचार प्रमुख राम खुर्दळ यासह वारकरी मोठ्या संखेनी या वेळी उपस्थित होते.