Breaking News

चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा

मुंबई : आपण नेहमी चेहरा सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी मेकअप देखील करतात. पण मेकअप सोबतच चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.  
* चेहर्‍यावर चमक आणण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी लिपस्टिकचा रंग बदला. तुम्ही जर लाईट लिपस्टिक वापरत असाल तर रेड रंगाची आउटलाईन करा. नवीन हेअर स्टाईल करा. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. * डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालीश करा. * चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो. * मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून चेह-यावर लावल्यास चेह-याचा रंग उजळतो. * रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजरचा ज्यूस प्यायल्याने चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते.