Breaking News

जाट आंदोलन सुरुच : मृतांचा आकडा 10 वर

चंदीगड, 21 - आरक्षणाच्या मुद्द्यावरून हरियाणातील जाट समाजाने हिंसक आंदोलन सुरुच ठेवले आहे. या आंदोलनादरम्यान झज्जरमध्ये लष्कराने केलेल्या गोळीबारात 10 आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत आंदोलकांचा आकडा आता 10 वर पोहोचला. तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
सोनीपतमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हरियाणातल्या एकूण 9 जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरूण जेटली आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर या बैठकीला उपस्थित होते. आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे सुद्धा या बैठकीला हजर होते. त्याशिवाय हरियाणातील नेत्यांनीही गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.