दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीवर बलात्कार
चंदीगड, 14 - थेली एका खासगी रुग्णालयातील आयसीयूत उपचार घेत असलेल्या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही पिडीत महिला दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी आहे.
सिजेरियन झाल्यानंतर पिडीत महिलेला आयसीयूत दाखल करण्यात आले होते. यावेळी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पिडीत महिलेने दिलेल्या साक्षीनंतर आरोपीवर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचा आरोप केला. ज्यावेळी ही घटना घडली त्याने आयसीयूमध्ये कोणीही स्टाफ उपस्थित नव्हते. दरम्यान, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. आरोपी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.