Breaking News

मी काहीही चूक केलेली नाही, कायदेशीर लढाई लढू : छगन भुजबळ

मुंबई, 09 - माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काही क्षणात विमानतळावर दाखल झाल्यानंतर आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मी कायदेशीर लढाई लढणार आहे. मी काहीही चूक केलेली नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
भुजबळ यांच्यापाठिमागे ईडीचा ससेमीरा लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. भुजबळांच्या समर्थनात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी नाशिक, नांदगाव आणि येवल्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते.