Breaking News

26/11 हल्ल्यात सिद्धिविनायक मंदिर मुख्य दार्गेट होते - हेडली

मुंबई, 09 - लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि मुंबईवरील हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली याची  अमेरिकेतील तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे साक्ष नोंदविली जात आहे. पाकिस्तानातील ‘आयएसआय’ने खडख लष्कर-ए-तोयबाच्या साथीने मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याचा दावा करून हेडलीने 26/11च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. 
त्यानंतर ‘आयएसआय’साठी हेरगिरी करतील अशी माणसे भारतीय सैन्यात भरती करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा हेडलीने मंगळवारी केला. हेडलीच्या या खुलाशामुळे पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आला आहे. लष्कर-ए-तोयबावर अमेरिकेने घातलेल्या बंदीला कायदेशीर आव्हान देण्याचा सल्लाही आपण हाफीज सईद आणि लख्वी यांना दिला होता, असेही हेडलीने कबुल केले आहे. यासोबतच मुंबई हल्ल्यावेळी नौदल, वायूदल आणि पोलीस मुख्यालयासोबतच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराही लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर होते, असे हेडलीने जबाबात म्हटले आहे.