Breaking News

आपत्कालीन कक्षाद्वारे प्रशासनाचे मांगीतुंगी महोत्सवातील परिस्थितीवर नियंत्रण

नाशिक/प्रतिनिधी। 17 -  भगवान ऋषभदेव यांच्या 108 फूट उंच मूर्तीचा आंतराष्ट्रीय प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्या दरम्यान भाविक, नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे कोणत्याही संभाव्य उद्भवल्यास परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुख्य डोंगराच्या पायथ्याशी 24 तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.
मांगीतुंगी येथे महोत्सव काळात तपस्वी,  संत, मुनीजन, साध्वी यांचे येथे वास्तव्य आहे. त्यांचे दर्शन व महोत्सवात योगदान देण्यासाठी लाखोंच्या संख्येने देश विदेशातील भाविक दाखल होत आहेत. प्रचंड गर्दीच्या काळात संभाव्य कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी व प्रशासनातील विविध कार्यकारी विभागांमध्ये समन्वयन राखणे आणि तातडीने कार्यवाही करण्याचे काम या कक्षाद्वारे करण्यात येत आहे. आपत्कालीन कक्षाचे संपर्क क्रमांक 9420644868, 9420644920, 9420644872 व 9420642360 आहेत.आपत्कालीन कक्षांतर्गत सेक्टर, सबसेक्टर मध्ये अधिकारी रात्रं-दिवस कार्यरत आहेत. महसूल, पोलिस, आरोग्य, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, भारत संचार निगम, जीवन प्राधिकरण, क
ृषी, वन विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.  आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरीकांना संपर्क साधता यावा यासाठी पोलिस, आरोग्य व अग्निशमन विभाग व सेक्टर  अधिकार्‍यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे ग्रामिण पोलिस नियंत्रण कक्ष संपर्क क्र.9420642672, आरोग्य विभाग नियंत्रण कक्ष 02555-223077, रुग्णवाहिका 108, अग्निशमन 9420690440, सेक्टर 1 (मांगीतुंगी पायथा ते माथा, मूर्ती परिसर) मो.क्र.7744842006, सेक्टर 2 
(निवास व्यवस्था) मो.क्र.9503921997, सेक्टर 3 (मुख्य सभामंडप व यज्ञस्थळ) मो.क्र.8275897646, सेक्टर 4 (वाहनतळ व वाहतूक व्यवस्था) 9422844999 असे आहेत.