वनबंधू परिषदेतर्फे उद्या ‘कबीर कॅफे’ चे आयोजन
नाशिक/प्रतिनिधी। 17 - वनबंधू परिषदेतर्फे बाराव्या वार्षिक दिनानिमित्त गुरूवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी कालिदास कलामंदिर येथे कबीर कॅफे या संत कबीर यांच्या दौह्यावर फ्युजन बॅण्डचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सुनील चांडक यांनी दिली.
कबीराचे दोहे आधुनिक संगीताच्या माध्यमातून तरूणांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य नीरज आर्य आणि प्रसिध्द संगीतकार विशाल दल आणि कबीर कॅफेच्या माध्यमातून जगभर करत आहे. त्यांच्याबरोबर मुकुंद रामास्वामी रमन अय्यर, वीरेन सोलंकी आणि पौबुन्प ब्रिटो केसी यांनी हा बॅण्ड तयार केला आहे. कार्यक्रमास तरूणाईने प्रतिसाद देऊन कबीराच्या दोह्यांद्वारे यशस्वी जीवनाचे रहस्य समजून घ्यावे, असे आवाहन चांडक यांनी केले. यावेळी रामरतन करवा, नेमिचंद पोद्दार, प्रदीप बुब, अशोक तापडिया, संजय मुंदडा आदि उपस्थित होते.