Breaking News

‘त्या’ मृतदेहाबाबत अद्यापही संभ्रम कायम

  बुलडाणा (प्रतिनिधी)। 16 - संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या राजुर घाटातील डबल मर्डर प्रकरणात तब्बल 22 दिवसाच्या तपासानंतर आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे की सापडलेले मुतदेह मनिषसिंग क्षत्रिय किंवा आदर्श गंगारामचे नाहीत. तर त्यातील एक मूतदेह हा राजस्थानमध्ये राहणार्‍या किसन चौधरीचा असल्याचे निष्पन्न होत आहे. विशेष म्हणजे किसन चौधरीही असाराम बापूचाच साधक असल्याची माहीती मिळत आहे. दोन संशयीतांना ताब्यात घेवून त्यांच्याकडुन मिळालेली माहिती आणि उलगडत असलेल्या काही तथ्यांवरून पोलिसांनी हे मूतदेह दुसर्‍याच व्यक्तींचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या संशयितांना सोडुन देण्यात आले असुन पोलिसांनी या घटनेचे तार जुळत असलेल्या ‘ठाणे’ जिल्ह्यावर तपास केंद्रीत केला आहे. दुसरीकडे हत्या करण्यात आल्या नंतर मूतदेह बुलडाण्याच्या घाटात फेकले असल्याचीही प्रबळ शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 
22 जानेवारी रोजी येथील राजुर घाटात दोन मूतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी सूरूवातीला मार्ग दाखल करून तपासाला सुरूवात केली. मात्र शवविच्धेदन अहवालात मूत्यु च्या कारणाचा सबळ खुलासा न होवू शकल्याने आणि घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यावरून सदर प्रकरण हे हत्याच वाटत असल्याने  पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला होता. मूतदेहाजवळ आढळून आलेल्या मोबाइल, मतदान कार्ड, पासपोर्ट फोटो आणि ए टी एम कार्डच्या आधारे पोलिसांनी मूतदेह ओळख पटविली. यात मूतकांची नावे मनीषसिंग क्षत्रिय आणि आदर्श गंगाराम असुन मनीष हा बिलासपुर गावचा तर गंगाराम उत्तर प्रदेशचा असल्याचे समोर आले होते. या खुनाचा तपास करण्यासाठी एपीआय रविराज जाधव यांच्या नेतूत्वात एक तपास पथक छत्तीसगड कडे रवाणा करण्यात आले. पोलिस पथकाणे छत्तीसगड आणि बिलासपुर येथे चौकशी केली असता मूतदेहाजवळ मिळालेले मतदाण कार्ड ज्यावर आदर्श गंगाराम राहणार आझामगड उत्तर प्रदेश असे लिहले होते ते  बनावट असल्याचे तपासात उघड झाले. मनीषसिंग क्षत्रिय हा आसाराम बापुंचा साधक असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ अजूनच वाढले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासपथक बिलासपुर, जोधपुर याठिकाणीही जावून आले आणि नंतर त्यांनी मुंबई गाठली आणि मुंबईतून या पथकाने सदर प्रकरणाशी संशयित दोन जणांना ताब्यात घेतले. मात्र त्यांचा घटनेशी संबंध नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. 
अतिशय नियोजनपूर्वक हे हत्याकांड घडविले गेले असून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मूतदेहाजवळ बनावट मतदान कार्ड प्लाट करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून डबल मर्डर प्रकरणात तपास करीत असलेल्या पोलिसांना फारसे काही हाती सापडले असे दिसून येत नाही. जे सापडले, त्याचा काहीच फायदा पोलिसांना झालेला नाही. मात्र एक मूतदेह किसन चौधरी नावाच्या व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट होत आहे. मूतदेहाजवळ मुंबई येथून इन्टेक्स कंपणीचा मोबाई विकत घेतल्याचे एक बिल सापडले होते. त्या बिलावर ‘किसन चौधरी’, असे लिहीलेले होते. कॉल डिटेल्स आणि इतर काही गोष्टीवरून दोघांपैकी एक मूतदेह किसन चौधरीचा असल्याचे निष्पन्न होत आहे. राजस्थान निवासी चौधरीचे आसाराम बापुच्या आश्रमाशी संबंध आहेत का? यसा दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. 
दोन जणांची हत्या होवून त्यांचा मूतदेह घाटात सापडण्याची घटना निश्‍चितच गंभीर आहे आणि त्याचा  काहीसा संबंध आसाराम बापूयाच्या जोधपूर आश्रमाशी येत असल्याच्या संशयामूळे प्रकरण छोटे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीपण पोलिस एवढ्या संत गतिने आणि तांत्रिकदूष्ट्या पूर्ण सक्षमतेने तपास का करीत नाही, हा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होत आहे. 22 दिवसानंतरही  डबल मर्डर प्रकरणाच्या तळाशी पोहोचत नसलेले  पोलिस वरच्यावरच पोहत असल्याचे दिसून येत आहे.