Breaking News

क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  बुलडाणा (प्रतिनिधी)। 16 - माध्यमिक शालांत  व उच्च माध्यमिक परिक्षेस प्रविष्ठ होणार्‍या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी/प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांना परिक्षेत वाढीव क्रीडा गुण सवलत देणेकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयान्वये यावर्षी वाढीव क्रीडा गुण सवलत देण्यात येणार आहे.
            सन 2015-16 या वर्षामध्ये खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे मुख्याध्यापक/प्राचार्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना कळविले आहे. सदर प्रस्ताव मा. विभागीय सचिव, अमरावती विभाग, अमरावती यांचेकडे सादर करावयाचे आहेत. तरी संबंधित खेळाडू विद्यार्थी, शारीरिक शिक्षण शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी यांनी कृपया परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत दि. 25 फेब्रुवारी 2016 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावेत. प्रस्ताव सादर करतांना राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाचे शैक्षणिक वर्ष, खेळाच्य क्रीडा प्रमाणपत्राचा अनुक्रमांक व प्रमाणपत्रावर स्पर्धा आयोजित करणार्‍या सर्व पदाधिकार्‍यांची स्वाक्षरी, सहभाग प्रमाणपत्रावर संस्थेचा/ असोसिएशनचा पत्ता, नोंदणी क्रमांक, दिनांक इत्यादी माहिती असणे आवश्यक आहेत. तसेच क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव हे चालु वर्षातील म्हणजेच 1 जुन ते 28 फेब्रुवारी या कालावधीतील स्पर्धा ग्राह्य धरण्यात येतील. तसेच संघटनेमार्फत आयोजित जिल्हा,विभाग, राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे परिपुर्ण अहवाल उपरोक्त शासन निर्णयानुसार तयार करुन एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा यांचेकडे सादर करावी. व एक प्रत मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे सादर करावी. तसेच अपुर्ण प्रस्ताव व उशिराने प्राप्त होणार्‍या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. तसेच क्रीडा सवलत गुणापासून खेळाडू विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबधित शाळा/महाविद्यालय, एकविध खेळ संघटना जबाबदार राहतील. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गणेश जाधव हे कळवितात.