Breaking News

भारतातले पहिले-वहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट अहमदाबादमध्ये सुरु

अहमदाबाद, 01 - भारतातले पहिले-वहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट अहमदाबादमध्ये सुरु झाले आहे. जमिनीपासून 20 फूट खाली सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जागेत बसून खवय्यांना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये नाश्ता आणि जेवणासोबत विविध जातींचे, रंगीबेरंगी मासे पाहण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे. 
अहमदाबादच्या बोपल भागात रिअल पोसिडॉन- अंडर वॉटर रेस्टॉरंट उभारण्यात आले आहे. तब्बल 3 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एका वेळेस 32 जण बसू शकतात. एक लाख 60 हजार लीटर पाणी हॉटेलच्या सभोवताली आहे.  खवय्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न रेस्टाॅरंटच्या संचालकांनी केला आहे. रेस्टॉरंटसाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगही करु शकता. एक फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी
पर्यटकांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे.