अर्थसंकल्पात आधार कार्डबाबत मोठी घोषणा
नवी दिल्ली, 29 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आधार कार्डबाबत मोठी घोषणा केली.
नागरिकांचे ओळखपत्र असलेल्या आधारकार्डला सरकार घटनात्मक दर्जा देणार असल्याचे जेटलींनी यावेळी घोषित केले. यामुळे सरकारद्वारे दिली जाणारी सबसिडीचा फायदा थेट नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास फायदा होईल. सध्या आधारकार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठीचे ओळखपत्र आहे. आतापर्यंत 98 कोटी लोकांना आधार नंबर जारी करण्यात आले. 11.19 कोटी प्रत्यक्ष लाभ अंतरण खात्यांशी आधारकार्ड जोडले गेले आहे. त्यामुळे एकूण लाभार्थींची संख्या 16.5 कोटींवर पोहोचली.