Breaking News

एकाच कुटुंबातील 14 जणांची हत्या; आरोपीची आत्महत्या

ठाणे, 28 - ठाण्यातील कासारवडवली परिसर आपल्याच कुटुंबातील 14 जणांची हत्या करुन आरोपीने आत्महत्या केली आहे, शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. ठाण्याच्या कासारवडवली परिसरातील वडवली मशिदीजवळ हे हत्याकांड घडलं. 
वरेकर कुटुंबातील चौदा जणांची सुरीने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्यांमध्ये 7 मुलं, 6 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. एक महिला जखमी असल्याची माहिती आहे. त्यानंतर आरोपी हस्नील वरेकरने स्वतःचंही आयुष्य संपवलं. या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.