पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना बसविल्या तोट्या
अहमदनगर । प्रतिनिधी । 01- जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. तर शहरात दिवसाआड पिण्याचे पाणी सुटत आहे. त्यातही ज्या नळांना तोट्या नाहीत अशा नळाव्दारे पिण्याचे पाणी वाया जात आहे. जर हेच पाणी वाया गेले नाही तर अनेकांना पिण्याचे पाणी मिळेल.
या सर्व गोष्टीचा विचार करुन वार्ड क्र.19 मधील नगरसेविका खाजाबी कुरेशी यांनी स्वखर्चातून आपल्या वार्डातील सर्व मोकळ्या नळांना तोट्या बसवून पाणी बचतीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी यांनी पुढाकार घेऊन स्वत नळांना तोट्या बसविल्या. या उपक्रमांचे सर्वच नगरसेवकांनी पालन करुन तोट्या बसविल्यास उन्हाळ्यात किमान आठ दिवस तरी नगरकरांना जास्त पिण्याचे पाणी मिळेल. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, महंमदसाब इराणी, फिरोज बक्कर कसाब, अफरोज शेख, तुकाराम गवळी, फैसल इराणी, जावेद शेख, उमर टेलर, मनपाचा हेड फिटर मनोज शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.